ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिमय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय यालाच भागवत संप्रदाय असेही म्हणतात.
वारकरी म्हणजे जो नित्य नियमाने आपल्या उपास्य देवताची वारी किंवा यात्रा न चुकता करत असतो.
वारकरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती करत असल्याने यांना वारकरी संप्रदाय म्हणतात.
या संप्रदायामध्ये विठ्ठलाच्या उपासनेला आणि त्याच्याकडे जाण्याच्या भक्तांच्या वोडीला किंवा नियमित वारीला खूप महत्त्व दिलेले आहे.
या संप्रदायातील भक्तांनी वर्षातून दोन वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिक शुद्ध एकादशीला अशा दोन वाऱ्या केल्या पाहिजे.
त्याचबरोबर शुद्ध माधी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशी या दोन दिवशी ही तुम्हाला पंढरपूर क्षेत्री वैष्णवांची एकच गर्दी झालेली दिसेल.
वारकरी संप्रदायाला माळकरी असेही म्हटले जाते. कारण प्रत्येक वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची 108 मनी असलेली माळ असते. या माळीला ते खूप महत्त्व देतात इतर धर्म पंथातही माळेला महत्व आहेत
परंतु वारकरी संप्रदाय ही तुळशीची माळ घातल्याशिवाय कुणालाही वारकरी बनता येत नाही.
माळ घालणे म्हणजे एक नवा अध्यात्मिक जन्म घेणे होय असे त्यांचे मत आहे.
विष्णू आणि श्रीकृष्ण भगवान वासुदेव हेच उपास्य दैवत आहे. वारकऱ्यांचे उपास्य दैवत विठ्ठल आहे विठ्ठल हे विष्णूचे रूप असणाऱ्या श्रीकृष्णाचा अवतार आहे. यासाठीच पंढरपुरास दक्षिण द्वारका असेही म्हणतात.
विष्णू पासूनच विठ्ठल हे नाव बनलेत असे अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे.