Vishal Gangurde
खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते, त्याला मांडे म्हणतात.
मांडे बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.
मांडे बनविण्यासाठी गव्हाचे पीठ दळल्यानंतर कपड्यानंतर चाळून घ्यावे.
पोळी करण्यासाठी पीठ मळून झाकून ठेवावं. त्यानंतर हरभऱ्याची डाळ त्यामधील उरलेलं पाणी काढावं.
डाळीमध्ये गूळ टाकून डाळ शिजवावी. त्यानंतर पुरण वाटावे. त्यात जायफळ,वेलची पूड टाकून पुरण थंड करून घ्यावे.
पूरण भरून पोळी थापावी. त्यानंतर पोळी हलक्या हाताने लाटून घ्यावी.
पोळीचा आकार हात आणि कोपऱ्याच्या मदतीने मोठा करावा.
पुरणपोळी भाजता खापर, मडके, कढईच्या उलट्या भागावर भाजावी.
पुरणपोळी व्यवस्थित भाजून त्यानंतर साजूक तूप घालून खावी.