Vishal Gangurde
खान्देशात मिरचीचा ठेचा मोठ्या आवडीने खाल्ला जातो.
ठेचा बनविण्यासाठी मध्यम आचेवर गॅसवर दोन ते तीन मिरच्या भाजून घ्या.
मिरच्या भाजल्यानंतर त्यात तेल घाला.
तेल घातल्यानंतर आलं आणि लसून घाला. त्यानंतर परतून घ्या.
परतून झाल्यानंतर त्यात मीठ घाला. त्यानंतर त्यावर पाच मिनिटे झाकण ठेवा.
सर्व वाटून घ्या
पाच मिनिटानंतर घरातील तांब्याच्या साहाय्याने सर्व वाटून घ्या.
वाटून घेतल्यानंतर मिरचीचा ठेचा तयार आहे.
गरम-गरम भाकरीसोबत ठेचा खाऊ शकता.