Vishal Gangurde
सर्वप्रथम एका कुकरमध्ये बटाटे शिजवून घ्यावे.
गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर तेल घालावे.
मीठ आणि तेल टाकल्यानंतर गव्हाचं पीठ हे मळून गोळा बनवा.
शिजलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, धने-जीरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ , आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालावे.
पोळी लाटून ३ चमचे बटाट्याचे सारण केलेले घालावे. त्यानंतर पाळी गोल आणि जाडसर लाटावी.
लाटलेली पोळी तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्या. भाजताना तेलाचाही वापर करा.
आता आपला बटाट्याचे पराठे तयार झाले असून तुम्ही दही किंवा सॉसबरोबर खाऊ शकता.