Bharat Jadhav
काहींना अशी भीती वाटते की त्यांची हाडे कमकुवत होत असावीत. परंतु, गुडघ्यातून येणारा हा आवाज 'ऑस्टिओपोरोसिस' हाडे कमकुवत होण्याशी संबंधित आजार दर्शवतो का?
यशोदा मेडिसिटी हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स, जॉइंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे डॉ. अमित शर्मा याबद्दल म्हणतात की, वैद्यकीय भाषेत गुडघ्यातून येणाऱ्या या आवाजाला 'क्रेपिटस' असे म्हणतात.
गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेल्या वायूच्या बुडबुड्यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे किंवा कंडरा आणि अस्थिबंधांच्या हालचालींमुळे असा आवाज येऊ शकतो.
जसजसे वय वाढते तसतसे काही लोकांमध्ये गुडघ्यातील गादी किंवा कूर्चा वाढत्या दाबामुळे झिजून जाते; यामुळे हाडे एकमेकांवर घासली जातात. त्यामुळे असा आवाज येतो.
ऑस्टिओपोरोसिस हा हाडांशी संबंधित एक आजार आहे, ज्यामध्ये हाडांची घनता कमी होते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात. या स्थितीत नवीन हाडे तयार होण्याचा वेग हा जुनी हाडे नष्ट होण्याच्या किंवा कमी होण्याच्या वेगापेक्षा मंदावलेला असतो.
ऑस्टिओपोरोसिसचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत.केवळ गुडघ्यातून 'कटकट असा आवाज येण्यावरून कोणाला ऑस्टिओपोरोसिस आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही; कारण असे आवाज या आजाराचे विशिष्ट लक्षण नाहीत. अचूक निदानासाठी, डॉक्टर 'बोन मिनरल डेन्सिटी' (BMD) चाचणी करण्याचा सल्ला देतात.
जर असा आवाज अधूनमधून येत असेल, तर काळजी करण्याचे फारसे कारण नाही; मात्र, जर तो दररोज येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर या आवाजासोबत वेदना, सूज किंवा जडपणा (कडकपणा) जाणवत असेल, तर हे 'ऑस्टिओआर्थरायटिस'चे (सांधेदुखीचे) लक्षण असू शकते.
वरील माहिती हे फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. तुम्हाला काही समस्या असेल तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा.