साम टिव्ही ब्युरो
हिंदी चित्रपटसृष्टीतील भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा 'किसी का भाई, कीसी की जान' हा चित्रपट येतो आहे.
चित्रपटामधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
'नय्यो लगदा' असं या गाण्याचं नाव आहे.
पलक मुच्छल आणि कमाल खान यांनी हे गाणं गायलं आहे. तर शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत.
हिमेश रेशमियानं या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
किसी का भाई किसी की जान या कॉमेडी अॅक्शन चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
'नय्यो लगदा' या गाण्यातील सलमान आणि पूजाची जोडी हिट ठरत आहे.