मुंबापुरीतील नवसाला पावणारा लालबागचा राजा कसा झाला भाविकांमध्ये प्रसिध्द !

कोमल दामुद्रे

मुंबईमध्ये गणेशोत्सवात सगळ्यात जास्त चर्चिला जाणारा गणपती अर्थात लालबागचा राजा.

Lalbaugcha Raja | Google

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९३४ साली झाली.

Shree Ganesh | Canva

पेरुचाळ येथे रस्त्यावर भरणारा बाजार १९३२ साली बंद पडला असता कोळी बांधव व इतर व्यापारी बंधूंनी बाजार समिती पुन्हा निर्माण होण्यासाठी श्री च्या मूर्तीला नवस केला. त्या जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली.

Lalbaugcha Raja | Google

१९३४ साली होडी वल्हवणारा दर्यासारंगाच्या रुपात 'श्री' ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून कोळी समाजाला नवसाला पावणारा हा गणपती लालबागचा राजा म्हणून प्रसिध्द झाला.

Lalbaugcha Raja | Google

दरवर्षी राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे येतात. मुखदर्शन व नवसाची अशा दोन रांगा भक्तांसाठी केल्या जातात.

Lalbaugcha Raja Darshan Line | Google

मूर्तीकार संतोष कांबळी यांच्या आजोबांनी लालबागच्या राजाची मूर्ती बनवली आणि हा वारसा पुढे सुरुच आहे.

Lalbaugchi murti | Google

विशेष म्हणजे प्रथम मूर्तीचे पाद्यपूजन केले जाते व त्याचे वेगवेगळे अवयव बनवून नंतर ते जोडले जातात.

Ganpati Padypujan | Google

अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल-ताशाच्या गजरात, थाटामाटात लालबागच्या राजाची मिरवणूक काढली जाते.

Ganesh Visarjan | Google

तब्बल २१ तासांच्या उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते.

Ganpati Visrajan | Google
येथे क्लिक करा