Shreya Maskar
किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडात खडे होणे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास लघवी अधिक घट्ट होते आणि त्यातील काही खनिजे एकत्र येऊन खडे तयार होतात.
तुम्हाला वारंवार किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपल्या लाइफस्टाइलमध्ये छोटे छोटे बदल करा. किडनी स्टोन होऊ नये यासाठीचे उपाय जाणून घ्या.
एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडे-थोडे पाणी प्या. तुम्ही नारळाचे पाणी देखील पिऊ शकता. साखर न घातलेले लिंबूपाणी देखील किडनी स्टोनवर फायदेशीर ठरते.
जास्त मीठामुळे काही प्रकारचे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. कॅल्शियम पूर्णपणे बंद करू नका.
फिकट पिवळी लघवी पुरेसे हायड्रेशन असल्याचे साधारण संकेत देते. त्यामुळे लघवीचा रंगाचा बदल दुर्लक्षित करू नका.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किडनी स्टोन (मुतखडा) टाळण्यासाठी दररोज सुमारे १० ते १२ ग्लास म्हणजेच साधारणपणे २.५ ते ३ लीटर पाणी प्यावे.
तुम्हाला हृदयविकार, किडनीचे गंभीर आजार, इतर शारीरिक समस्या असतील तर पाण्याचे प्रमाण एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.