Shreya Maskar
ऑक्झॅलेट्स नैसर्गिकरित्या चहामध्ये आढळतात. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चहा पिता तेव्हा हे घटक थेट मूत्रपिंडांपर्यंत पोहोचतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ऑक्झॅलेट्स कॅल्शियमसोबत संयोग करून स्फटिक तयार करतात, जे नंतर किडनीत जमा होतात.
ऑक्झॅलेट्स हे वनस्पती आणि खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे सेंद्रिय संयुग आहे, जे शरीरात अतिप्रमाणात साचल्यास कॅल्शियम ऑक्झॅलेट मुतखडा (Kidney Stone) तयार होण्यास कारणीभूत ठरते.
चहा एक मूत्रवर्धक आहे, म्हणजेच तो शरीरातील पाणी बाहेर टाकतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने निर्जलीकरण होऊ शकते, ज्यामुळे मूत्रपिंडांना रक्त गाळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने कॅफीनमुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो, ज्यामुळे दीर्घकाळात मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.
चहा आम्लधर्मी असतो आणि रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्यास पोटातील पित्तरसात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो.
चहामधील टॅनिनमुळे मळमळ आणि जळजळ होऊ शकते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे मूत्रपिंडाच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो.
जर तुम्हाला किडनीसंबंधित कोणताही आजार असेल तर चहा कमी प्या. मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी हा फायदेशीर चहा मानला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.