Kidney Stone : सामान्य वाटणारी 'ही' लक्षणं देतात किडनी स्टोनचा संकेत, दुर्लक्ष करणे महागात पडेल

Shreya Maskar

किडनी स्टोन

मुतखडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरेसे पाणी न पिणे, पौष्टिक आहाराचा अभाव आणि कौटुंबिक इतिहास आहे.

Kidney stone | pinterest

कंबरदुखी

तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर तीव्र कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. बरगड्यांच्या खाली पाठीत किंवा बाजूला तीव्र वेदना, जी जांघेपर्यंत पसरू शकते.

back pain | pinterest

लघवी करताना त्रास

जेव्हा खडा मूत्राशयाच्या जवळ येतो, तेव्हा लघवी करताना जळजळ, वेदना होतात. जळजळीमुळे लघवी गुलाबी, लाल किंवा तपकिरी रंगाची दिसते.

Difficulty urinating | pinterest

लघवीचे प्रमाण

खड्यामुळे लघवीचा सामान्य प्रवाह थांबल्याने लघवीचे फक्त लहान थेंब पडतात. पण वारंवार शौचालयात जाण्यासाठी अचानक तीव्र दाब जाणवतो.

Urine volume | pinterest

लघवीचा रंग

मुतखड्याची समस्या असलेल्या लोकांच्या लघवीचा रंग बदलतो तसेच लघवीला दुर्गंधी देखील येते. लघवीच्या रंगात किंवा वासात बदल, जे जळजळ किंवा संसर्ग दर्शवू शकते.

Color of urine | pinterest

उलट्या

तुम्हाला मळमळ आणि उलट्यांचा त्रास वारंवार जाणवतो. गंभीर अंगदुखीमुळे पोट खराब होते. किडनीच्या बाजूला तीव्र वेदना उद्भवतात.

Vomiting | pinterest

ताप येणे

किडनी स्टोन , किडनीला इन्फेक्शन झाले असेल तर ताप येतो. हे सामान्य लक्षण आहे.

fever | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात वाढतो किडनी खराब होण्याचा धोका, 'या' चुका ठरतात घातक

Kidney Damage | AI PHOTO
येथे क्लिक करा...