ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच एका हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत. जे त्याच्या अद्भुत सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रातील डोंबिवलीजवळील खंडाळा या अतिशय सुंदर हिल स्टेशनबद्दल जाणून घेऊ. सौंदर्याने भरलेलं हे हिल स्टेशन प्रत्येक ऋतूत पर्यटकांना आकर्षित करते.
हे महाराष्ट्रातील डोंबिवलीपासून ७३ किमी अंतरावर आहे. खंडाळा हिल स्टेशनवर गेल्यानंतर, तुम्हाला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळेल.
हे ठिकाण त्याच्या सुंदर जंगलांसाठी, टेकड्यांसाठी आणि धबधब्यांसाठी ओळखलं जातं.
या ठिकाणी असलेलं सौंदर्य तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. या सुंदर हिल स्टेशनची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६२२ मीटर आहे.
जर तुम्ही पावसाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्राला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या यादीत खंडाळा हिल स्टेशनचे नाव नक्कीच समाविष्ट करा.
खंडाळा हिल स्टेशन हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे जे ट्रेकिंग, कॅम्पिंग करता येतं.