Sakshi Sunil Jadhav
खणाच्या साड्या (Khana Saree) पारंपरिक आणि एलिगंट लुक देतात. पण योग्य कॉनट्रास्ट ब्लाउज निवडला तर तुमचा संपूर्ण लुक अजून उठून दिसतो. लग्नसमारंभासाठी कमी बजेटमध्ये परफेक्ट ठरणारे ८ ट्रेंडी ब्लाउज पॅटर्न्स पाहा.
गोल्डन झरी असलेला ब्रोकॅड ब्लाउज खणाच्या साडीवर रॉयल लुक देतो. मरून-गोल्ड, रॉयल ब्लू-गोल्ड हे रंग तुम्ही फेस्टिव्हलसाठी वापरु शकता.
लहान मिरर वर्कमुळे ब्लाउज चमकदार आणि फेस्टिव्ह दिसतो. खणाच्या साड्यांमध्ये ग्रीन-सिल्वर, ब्लॅक-मल्टीकलर हे कॉन्ट्रास्ट रंग जास्त शोभून दिसतील.
सिंपल सिल्क फॅब्रिकमध्ये कॉनट्रास्ट रंग खूप एलिगंट दिसतो. पिवळा-जांभळा, गुलाबी-हिरवा हे कॉन्ट्रास्ट रंग जास्त वापरले जातात.
एल्बो स्लीव्ह आणि हलकी एम्ब्रॉयडरी लुकला क्लासिक टच देते. तुम्हाला सगळ्यात हेटके लूक हवा असेल तर नेव्ही ब्लू-गोल्ड, रेड-बेज हे कॉन्ट्रास्ट रंग वापरा.
बोट नेक डिझाइन खण साडीवर मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतो. यामध्ये तुम्हाला पर्पल-सिल्वर, पीच-गोल्ड हे कॉन्ट्रास्ट रंग जास्त रिच लूक देतील.
साधा पण शार्प लुक देणारा हा ब्लाउज बजेट फ्रेंडली आहे. कॉन्ट्रास्ट रंगांमध्ये तुम्हाला ब्लॅक-रेड, व्हाइट-ग्रीन हे जास्त सूट होतील.
हाय नेक डिझाइन तुम्हाला एलिगंट आणि रॉयल लुक देते. यामध्ये तुम्हाला गोल्डन-मरून, मस्टर्ड-ब्राउन हे कॉन्ट्रास्ट रंग जास्त शोभून दिसतील.
बॅक साइडला कटवर्क डिझाइनमुळे लुक ग्लॅमरस दिसतो. यामध्ये पिंक-गोल्ड, टील-ग्रीन हे कॉन्ट्रास्ट रंग जास्त शोभून दिसतील.