ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात बुधवारची रात्र ही काळरात्र ठरली.
मध्यरात्री या गावात काळाने घाला घातला अन् अख्ख गाव दरडीखाली गाडलं गेलं.
दीडशे ते दोनशे घरांची वस्ती असलेलं हे संपूर्ण गाव क्षणात होत्याचं नव्हतं झालं
या दुर्घटनेत बचावकार्य सुरू असून शासनाने शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
अनेक सेलिब्रिटी स्टार मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत जुईने, 'जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील' असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर जुईच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.