Surabhi Jayashree Jagdish
कातळधार धबधबा हा पुण्याजवळील मुळशी तालुक्यात असलेला एक निसर्गरम्य आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला धबधबा आहे.
पावसाळ्यात भरभरून वाहणारा हा धबधबा डोंगर उतारावरून मोठ्या उंचीवरून खाली कोसळतो.
हा धबधबा अतिशय उंचीवरून कोसळतो आणि त्याचे पाणी दगडांच्या कड्यांवरून खाली झरझरत येतं. त्यामुळेच याला कातळधार म्हणजेच दगडावरून वाहणारा धबधबा असं नाव पडलं आहे.
पुण्यातून पिरंगुट मार्गे पउणेमुळशी रस्त्यावरून ताम्हिणी घाटाच्या दिशेने जा. मुळशी धरण पार केल्यावर दांडे गाव किंवा एकदरा गाव लागतं.
गावातून कातळधार धबधब्याची वाट विचारून ठराविक ठिकाणी गाडी पार्क करून चालत जावं लागतं. सुमारे तीस ते चाळीस मिनिटांचा लहान ट्रेक आहे
या धबधब्यावर जाण्यासाठी ट्रेकचा रस्ता जंगलातून, डोंगर उतारावरून आणि थोड्या ओढ्यांतून जातो.
पुणे ते कातळधार धबधबा अंदाजे ६० ते ७० किलोमीटर आहे. प्रवासाचा वेळ सुमारे दोन ते अडीच तास असतो