ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'मधून प्रसिद्धी मिळवलेली लोकप्रिय गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड.
कार्तिकी गायकवाडच्या फोटोंनी वेधलं लक्ष, बालीमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद
आताही कार्तिकी तिच्या गाण्याने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. सध्या कार्तिकी बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
सुमधूर आवाजाने कार्तिकीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
बालीमध्ये कार्तिकी आणि रोनितने खास पेहरावही केला होता. कार्तिकीने पतीसह बाली येथील अनेक ठिकाणांना भेटी दिल्याचं तिच्या फोटोत दिसत आहे.
कार्तिकीने तिच्या पतीबरोबरचेही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने रोनितबरोबर रोमँटिक पोझ दिल्याचंही दिसत आहे.
कार्तिकी आणि रोनितचे फोटो चाहच्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव करत कमेंटही केल्या आहेत.