कोमल दामुद्रे
कार्तिक हा पूर्ण महिना खरं तर देवांसाठी ओळखला जातो. या महिन्याचे खास महत्त्व असते. यंदा ही पौर्णिमा ८ नोव्हेंबरला आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी गंगा नदीच्या किनारी दीपदान करणे अधिक शुभ मानले जाते. तसेच आपण कोणत्याही नदी किंवा तलावा जवळ हे करु शकतो.
कार्तिकच्या पूर्ण महिन्यात तुळशीची पूजा करायला हवी. विशेष करुन पौर्णिमेच्या दिवशी तुळशी जवळ दिवा लावावा.
घराच्या सुख व समृध्दीसाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावावे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान सोडून अन्न व कपड्याचे दानही करायला हवे. यामुळे घरात पैसा टिकून राहातो.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आल्यानंतर खिरी मध्ये साखर व गंगाजल मिसळून लक्ष्मीला अर्पण करावे.
या दिवशी गोड पाण्यात दुध मिसळवून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.