Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? अभिनेत्रीच्या टीमने केला मोठा खुलासा

Shruti Vilas Kadam

प्रेग्नन्सीच्या चर्चांना पूर्णविराम

करीना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. मात्र, तिच्या टीमने ती प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Kareena Kapoor

व्हिडिओमुळे अफवांना उधाण

नुकताच करीना कुटुंबासोबत बीच हॉलिडेवरून परतताना दिसली. यावेळी तिच्या टीममधील एका व्यक्तीने छत्रीने तिला कॅमेऱ्यांपासून झाकण्याचा प्रयत्न केला.

Kareena Kapoor | Saam Tv

बेबी बंप दिसल्याचा दावा

या व्हिडिओमध्ये करीनाच्या पोटाचा भाग काहीसा फुगीर दिसल्याने नेटकऱ्यांनी ती गरोदर असल्याचा अंदाज व्यक्त केला आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

Kareena Kapoor

तिसऱ्या बाळाबाबत चर्चा

करीना आणि सैफ अली खान यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत. त्यामुळे व्हायरल व्हिडिओनंतर तिसऱ्या बाळाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज लावले गेले.

Kareena Kapoor

करीना-सैफचं कुटुंब

करीना आणि सैफ अली खान यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. दोघे आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतात.

Kareena Kapoor

अभिनेत्रीने यापूर्वीही व्यक्त केला होता विचार

करीनाने यापूर्वी आणखी मुलं नको असल्याचं मत व्यक्त केल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्याच्या चर्चांना तिच्या टीमच्या स्पष्टीकरणाने पूर्णविराम मिळाला आहे.

Kareena Kapoor | instagram

अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

केवळ एखाद्या व्हिडिओतील दिसण्यावरून प्रेग्नन्सीचा अंदाज लावणं योग्य नाही. करीनाच्या टीमने अधिकृतपणे ती प्रेग्नंट नसल्याचं सांगितल्याने सोशल मीडियावरील चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Kareena Kapoor

Marriage Tips: यंदा लग्न ठरलंय? मग, गाडी-घरापेक्षा जोडीदारामध्ये 'हे' ४ गुण नक्की तपासा, संसार होईल सुखी

Marriage Tips | Saam Tv
येथे क्लिक करा