Priya More
कापूर हा फक्त देवासमोर जाळण्यासाठी वापरला जात नाही. कापूरचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
कापूर हे सुगंधी आणि आरोग्यदायी द्रव आहे. केसापासून ते त्वचेपर्यंत सर्वांसाठी कापूर फायदेशीर आहे.
कापूरचा एक तुकडा आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहते आणि ताजेतवाणे वाटते.
कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. त्वचेवरील जीवाणू नष्ट होतात.
तुमच्या शरीराला खाज येत असेल आणि तुम्हाला ॲलर्जी असेल तर कापूरच्या पाण्याने नक्की आंघोळ करा.
तुमच्या शरीरावर जर पूरळ असतील तर कापूरचे पाणी शरीराला लावा त्यामुळे पूरळ जाण्यास मदत होते.
कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे दिवसभर आलेला थकवा आणि ताण दूर होण्यास मदत होते.
कापूरचा तुकडा पाण्यात टाकून त्याने केस धुतल्यामुळे कोंडा दूर होतो. टाळूवर येणारी खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
कापूरच्या पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील मुरूम आणि पूरळ दूर होतात.
कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्नायूंचे दुखणे कमी होते. शरीरावरील सूज कमी होते.
कापूरच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे सर्दी -खोकल्यापासून आराम मिळतो. सर्दीमुळे बंद झालेले नाक उघडते.