Shreya Maskar
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली शिवाली परबचा मोठा चाहता वर्ग आहे.
शिवालीने आपल्या अभिनयाच्या आणि कॉमेडीच्या जोरावर स्वतःची ओळख बनवली आहे.
शिवाली परबने नुकतेच साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
शिवालीने फ्लॉवर प्रिंट मल्टिकलर साडी नेसली आहे.
मोकळे केस, हातात कलरफूल बांगड्या आणि कानात झुमका असा हटके लूक तिने केला आहे.
शिवालीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "इश्क के नाम से डर लगता था...दिल के अंजाम से डर लगता था...आशिकी वो ही मेरे साथ हो गयी …"
शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
फोटोतील तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.