Ruchika Jadhav
शॉपिंग म्हणजे सर्वच मुलींसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय.
घरात किती कपडे असले तरी मुलींना शॉपिंग करावीच वाटते.
तर मुलींना मनसोक्त शॉपिंग करता यावी यासाठी आम्ही एक हिडन प्लेस शोधून काढलंय.
पाकिटाला फटका न बसता अगदी स्वस्तात कपडे खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी हे ठिकाण फार महत्वाचं आहे.
कल्याणमधील कल्याण फॅशन सेल येथे वर्षातील सर्वात मोठा सेल सुरू आहे.
या सेलमध्ये फक्त २०० रुपयांत मुलींसाठी सर्वच प्रकारचे आउटफीट उपलब्ध आहेत.
८ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हा सेल सुरू आहे.
कल्यान पश्चिमेला आचार्य आत्रे रंगमंदिरापासून हे शॉप अगदी जवळ आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत शॉप सुरू असते.