ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
गोष्ट एका पैठणीची या सिनेमात सायलीने काम केलं. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
अनेकदा अभिनयक्षेत्रात आल्यानंतर कलाकार त्यांची मुळ नावात बदल करत दुसऱ्याच नावाने नावारूपाला येतात.
अभिनेत्री सायली संजीव हे नाव मराठी सिनेसृष्टीत सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातंय.
पण तुम्ही कधी हा विचार केलाय का सायली संजीवचं आडनाव नक्की काय आहे.
'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहचलेली सायली संजीव आपल्या नावापुढे आडनाव लावत नाही.
सायलीचे आडनाव संजीव नसून ते तिच्या वडिलांचे नाव आहे. तिचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसारकर असे आहे.