Manasvi Choudhary
साताऱ्यातील कास पठार हे फुलोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. विविध रंगीबेरंगी फुलांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. फुलांच्या हंगामात पठाराचे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्राहून पर्यटकांची गर्दी होते.
यावर्षी १ सप्टेंबरपासून या फुलोत्सवला सुरूवात होणार आहे. फुलोत्सव फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन बुकिंग, प्रवेश शुल्क आणि उपलब्ध वेळ तपासणे महत्त्वाचे आहे.
कास फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांसाठी प्रतिव्यक्ती २०० रूपये शुल्क आहे. तर बारा वर्षाच्या आतील मुलांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.
कास फुलोत्सव पाहण्यासाठी तुम्हाला या पार्किंग ते कास पठार अशी बससेवा मोफत असणार आहे.
शालेय विद्यार्थी व सहलींसाठी शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी सोडून प्रवेश असणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थ्यी ४० रूपये शुल्क आकारले जाईल. तसेच सहलीसाठी तुमच्याकडे मुख्याध्यापकांचे पत्र आवश्यक आहे.
फुलोत्सवसाठी ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर बुकिंग करता येईल.
पर्यटकांनी फोटोग्राफीसाठी कॅमेरा शुल्क आकारले जाणार नाही. कास परिसरात ड्रोन उडवण्यावर निर्बंध असतील. विना परवानगी ड्रोन उडवल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
कासचा हंगाम यशस्वी करण्यासाठी समिती व वनविभाग सज्ज झाला आहे. पर्यटकांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सुट्टीच्या दिवशी येताना ऑनलाइन बुकिंग करून यावे अशी माहिती संतोष पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.