Sakshi Sunil Jadhav
नव्या वर्षात रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी ९० दिवसांचा भन्नाट रिचार्ज प्लान आणला आहे.
रिलायन्स जिओकडून 90 दिवसांची वैधता असलेला एक भन्नाट रिचार्ज प्लान सध्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
तुम्हाला या प्लानमध्ये एकूण 200GB डेटा मिळेल, त्यामध्ये दररोज 2GB डेटा आणि सोबत डबल 20GB डेटा यामध्ये मिळणार आहे.
प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा देण्यात आली आहे.
5G स्मार्टफोन असलेल्या ग्राहकांसाठी या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील उपलब्ध आहे.
जिओकडून या प्लानसोबत JioHome चा 2 महिन्यांचा फ्री ट्रायल देण्यात येणार आहे. पण हा फायदा नवीन कनेक्शनवरच लागू आहे.
ग्राहकांना JioHotstar चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळेल, ज्यामध्ये मोबाइल आणि टीव्ही दोन्हीवर कंटेंट पाहता येईल.
जास्त फायद्यांमध्ये Jio AI Cloud अंतर्गत 50GB स्टोरेज आणि तब्बल 18 महिन्यांचे Google Gemini Pro सबस्क्रिप्शन मिळत आहे.
Jioचा हा प्लान 899 रुपयांचा आहे. जिओच्या पोर्टफोलिओमधील सर्वात वेगळा आणि व्हॅल्यू फॉर मनी प्लान मानला जात आहे.