Sakshi Sunil Jadhav
सध्या Jioचे युजर्स भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यासाठी नव्या वर्षात खास ऑफर्सही आणल्या आहेत.
आत्तापर्यंत जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी खूप चांगल्या आणि स्वस्त प्लानच्या ऑफर्स दिल्या आहेत. त्यामध्ये इंटरनेटच्याही अनेक सवलती मिळाल्या आहेत.
पुढे आपण अशाच एका प्लानबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत Unlimited 5G Data मिळणार आहे.
रिलायन्स जिओने बजेट युजर्ससाठी 198 रुपयांचा प्रीपेड प्लान सादर केला आहे. हा प्लान 200 रुपयांपेक्षा कमी दरात मिळणार आहे.
तुम्हाला या प्लानमध्ये युजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा, देशभरात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील.
तुम्हाला या रिचार्जमध्ये 14 दिवसांची वैधता मिळेल. ज्यामध्ये एकूण 28GB डेटा युजर्सना वापरता येईल.
जर युजर 5G एरियामध्ये असेल आणि 5G स्मार्टफोन असेल, तर याच प्लानवर Unlimited 5G Data मिळतो.
जर तुमचा दररोजचा डेटा संपला तर इंटरनेट स्पीड 64kbps वर चालू राहील. त्याने तुम्ही बेसिक ब्राउजिंग करु शकता.
तुम्हाला या रिचार्जमध्ये JioTV वर लाईव्ह टीव्ही पाहण्याची सुविधा आणि Jio Cloud Storage चा फायदाही मिळेल.