Priya More
'जीव माझा गुंतला'या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.
या रिल लाइफ कपलने एकमेकांना रिअल लाइफमध्ये देखील आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली आहे.
योगिता आणि सौरभ यांनी मोठ्या थाटामाटामध्ये आज लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
योगिता आणि सौरभ या कपलवर त्यांच्या चाहत्यांनी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केला. या फोटोला चांगली पसंती मिळत आहे.
योगिताने हिरवी काठ आणि मरून कलरची साडी नेसली होती. नववधूच्या रुपामध्ये योगिता खूपच सुंदर दिसत होती.
सौरभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोरत परिधान केले होते. त्याचसोबत त्याने हिरव्या रंगाची शाल आणि डोक्यावर हिरव्या-सोनेरी रंगाचा फेटा बांधला होता.
योगिता आणि सौरभने इन्स्टावर लग्नातील सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कायमचा हमसफर, 03.03.2024'
योगिता आणि सौरभवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. योगिता आणि सौरभने 'जीव माझा गुंतला' या मालिकेमध्ये एकत्र काम केले.
या मालिकेमध्ये योगिताने अंतराची भूमिका साकारली होती. तर सौरभने मल्हारची भूमिका साकारली होती.
योगिता आणि सौरभच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. या मालिकेमुळे या कपलला विशेष पसंती मिळाली.
आता या रिललाइफ कपलने रिअल लाइफमध्ये एकमेकांसोबत लग्न केल्यामुळे त्यांचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.