Shreya Maskar
उन्हाळ्यात तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचे असेल तर जव्हार हिल स्टेशन भन्नाट लोकेशन आहे. हे ठिकाणे धबधबे, आदिवासी कला आणि समृद्ध राजेशाही वारशासाठी प्रसिद्ध आहे.
जव्हार हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण (हिल स्टेशन) आहे. पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.
जव्हार हिल स्टेशन ५१८ मीटर उंचीवर वसलेले असून, येथील हिरवीगार निसर्ग, धबधबे, समृद्ध वारली पेंटिंग पाहायला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला थंड वातावरण अनुभवता येते.
जव्हारपासून साधारण २० किमी अंतरावर दाभोसा धबधबा वसलेला आहे. ३०० फूट उंचीचा आणि अनेक टप्प्यांत कोसळणारा दाभोसा धबधबा, विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो.
जव्हार जवळील टेबल लँड पॉइंटवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पठारावरून आजूबाजूच्या दऱ्या आणि टेकड्यांमागे मावळणारा सूर्य एक अप्रतिम नजराणा सादर करतो.
जव्हार हे येथील मूळ रहिवासी असलेल्या वारली आदिवासी जमातीचे सांस्कृतिक केंद्र आहे. येथे तुम्ही आदिवासी चित्रे तुम्ही थेट स्थानिक कलाकारांकडून खरेदी करू शकता.
पालघर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने जव्हार हिल स्टेशनला पोहचला. येथे आजूबाजूला राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.