Chetan Bodke
प्रियामणी साऊथसोबतच बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.
लवकरच प्रियामणी शाहरूखच्या ‘जवान’मध्येही झळकणार आहे.
पण, प्रियामणी चित्रपटामध्ये कोणते पात्र साकारणार आहे, अद्याप हे गुलदस्त्यात आहे.
प्रियामणी ही बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
प्रियामणी कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
प्रियामणीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
प्रियामणीने गेल्या काही दिवसांपूर्वी गुलाबी रंगाच्या गाऊन मधले काही फोटो शेअर केले होते, त्यामध्ये अभिनेत्रीचे निखळ सौंदर्य दिसून येत आहे.
अभिनेत्रीने या लूकमध्ये ग्लॉसी मेकअप केला असून तिचे इयर रिंग्स खूपच चर्चेचा विषय ठरले आहे.
अभिनेत्रीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.