Bharat Jadhav
जगातील अनेक देश वृद्ध लोकसंख्येशी झगडत आहेत. या देशांमध्ये मृत्यूदर जन्मदरापेक्षा जास्त आहे.
जपान सरकार देशात मुलांचा जन्म कमी होत असल्याच्या समस्येने ग्रासलाय. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने डेटिंग ॲप लाँच केलंय.
या डेटिंग अॅपवर लॉग इन करण्यासाठी युझर्सला उत्पन्नाचा पुरावा. तसेच ते अविवाहित असल्याची कागदपत्रे सादर करावी लागतील.
याशिवाय युझर्स कॅज्युअल डेटिंग करू शकणार नाहीत. लग्नासाठी जोडीदार शोधत असल्याचं प्रतिज्ञापत्रदेखील युझर्सला साइन करावं लागेल.
जन्मदर वाढवण्यासाठी जपान सरकार डेटिंग अॅपसह अनेक उपक्रम राबवत आहे. यासाठी सरकारने २७ कोटी रुपयांची तरतूद केलीय. ja
जपान सरकारच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये मुलांच्या जन्माचे प्रमाणात १.२० टक्क्यांनी घट झालीय.
मुलांचे संगोपन करणाऱ्या पालकांना किंवा बाळांची अपेक्षा करणाऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्यासाठी कायद्यांच्या सुधारणेस मंजुरी दिलीय.
येथे क्लिक करा