Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी तब्येत जपणं आज गरजेचे आहे; वाचा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

आज आपला राशीला कामाशी निगडित प्रवास होण्याचा दाट संभव आहे. समाजामध्ये मानसन्मान वाढतील.

वृषभ

आजवर केलेल्या कामाचे चांगले फलित आजच्या दिवशी मिळेल. संतती सुवार्ता, पुत्र - पौत्रसुख या दृष्टीने दिवस चांगला आहे

मिथुन

पैशाच्या मागे लागून पैसे मिळणार नाहीत. कष्ट आणि मेहनत आज सचोटीने कराल तर धनलाभाची शक्यता आहे.

कर्क

दिवस आनंदघन घेऊन आलेला आहे. व्यवसायातील भागीदार आपल्या मनाप्रमाणे नवनवीन बैठक आणि प्रोजेक्ट घेऊन सल्लामसलतीसाठी येईल.

सिंह

तब्येत जपणं आज गरजेचे आहे. पाठीचे दुखणे, हृदयाचे विकार डोके वर काढतील.

कन्या

विद्वान असणारी आपली रास. नवनवीन गोष्टी शिकायला सुद्धा आवडतात. आपली प्रज्ञा वाढती राहील. विष्णू उपासना करावी.

तूळ

रसिक असणारी आपली रास आहे. आज कुटुंबीयांमध्ये पाहुण्यांचे आगमन होईल.

वृश्चिक

आज काही गोष्टी ठरवून होतील असे नाही. दहा लोकांची काम एकटे करण्याची ताकद आज तुमच्यामध्ये येईल.

धनु

पैशाची आवक जबरदस्त चांगली राहील. कष्टाने आणि मेहनतीने मिळवलेला पैसा आपल्याला खऱ्या अर्थाने सुख देतो हे आज जाणवेल.

मकर

शांततेने आपली कामे करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. इतर कोणाच्या मध्ये लुडबुड करण्यापेक्षा एकटे राहणे आज पसंत कराल.

कुंभ

काही गोष्टी शक्तीने नाही तर युक्तीने कराव्या लागतील असा दिवस आहे. नको त्या गोष्टीचा ससेमीरा मागे लागणार आहे.

मीन

परदेशाशी निगडित वार्तालाप होतील. व्यवसायामध्ये वृद्धी आणि प्रगती दोन्ही दिसते आहे.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा