Surabhi Jagdish
दररोजच्या जेवणासाठी आपण कणीक भिजवतो. मात्र अनेकदा भिजवून ठेवलेलं कणीक काळी पडू लागते.
आज आम्ही तुम्हाला कणीक काळी पडू नये म्हणून टीप्स सांगणार आहोत
कणिक मळताना नेहमी तूप किंवा तेलाचा वापर करा. त्यामुळे कणिक मऊ आणि बराचं काळ चांगली टिकून राहते.
कणिक नेहमी हवाबंद डब्यात ठेवणं योग्य आहे. डब्यात कणिक ठेवताना कणिकेला कापडात गुंडाळूनचं ठेवावे.
कणिक ठेवण्यासाठी झिपलॉक बॅगचा वापर करा. यामध्ये ठेवताना त्यातील अतिरिक्त हवा काढून टाका.
कणिक ही थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवली पाहिजे. तुम्ही डब्यात किंवा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये कणिक ठेवली असेल तर ती फ्रिजमध्ये ठेवावी.