ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही वैज्ञानिक संशोधनानुसार पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत करते.
अहवालानुसार, झोप डोक्याचे प्रोसेसिंग सेंटर सक्रिय करते आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरते.
पुरेशी झोप घेतल्यास मूड सुधारतो आणि मानसिक ताण कमी होतो, त्यामुळे एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
झोपल्यावर शरीरात ह्युमन ग्रोथ हार्मोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मांसपेशींचा विकास होतो आणि शरीर मजबूत राहते.
पुरेशी झोप न झाल्यास हॉर्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे भूक वाढते आणि जास्त खाण्याची शक्यता निर्माण होते.