Credit Card Rent Payment : क्रेडिट कार्डने घरभाडे भरणे फायदेशीर की तोट्याचे? जाणून घ्या

Sakshi Sunil Jadhav

ऑनलाइन पेमेंट

सध्या अनेकजण घरभाडे भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू लागले आहेत. पण या पर्याय योग्य की अयोग्य हे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जाणून घेऊयात.

Credit Card

घरभाडे भरण्याची सोपी पद्धत

अनेक डिजिटल पेमेंट अॅप्स आणि प्लॅटफॉर्मच्या मदतीने आता क्रेडिट कार्डच्या मदतीने घरभाडे भरता येतं. त्यामुळे रोख रक्कम किंवा बँक खात्यातील शिल्लक नसली तरी वेळेत भाडे भरता येतं.

Credit Card

व्यवहार शुल्क

बहुतेक प्लॅटफॉर्म क्रेडिट कार्डाने भाडे भरताना 0.5% ते 2% किंवा त्यापेक्षा जास्त कन्व्हिनियन्स फी आकारतात. त्यामुळे व्यवहाराचा खर्च वाढू शकतो.

credit card rent payment

रिवॉर्ड पॉइंट्स

पूर्वी बऱ्याच बँका अशा व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंंट्स किंवा कॅशबॅक देत होत्या. पण आता अनेक बँकांनी घरभाड्याच्या व्यवहारांवर हे फायदे कमी केले आहेत.

credit card rent payment

पगार उशिरा येण्याची समस्या

जर घरभाडे महिन्याच्या सुरुवातीला भरावं लागत असेल आणि पगार काही दिवसांनी मिळत असेल, तर क्रेडिट कार्डमुळे आर्थिक ताण कमी होऊ शकतो.

credit card rent payment

भविष्यात होणारा फायदा

क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल नियोजित तारखेआधी भरल्यावर कोणतेही जास्तीचे व्याज द्यावे लागत नाही. त्यामुळे ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी फायदेशीर ठरू शकते.

pay house rent with credit card

क्रेडिट कार्डला कर्ज समजू नका

तज्ज्ञांच्या मते, क्रेडिट कार्ड हे केवळ पेमेंटचे साधन म्हणून वापरावे. नियमितपणे पूर्ण बिल भरल्यास आर्थिक शिस्त पाळता येते.

credit card rent payment

फायदे आणि शुल्काची तुलना

क्रेडिट कार्डने घरभाडे भरण्यापूर्वी मिळणारे रिवॉर्ड, कॅशबॅक आणि आकारली जाणारी फी यांचा तुलनात्मक विचार करा. फायदा कमी आणि शुल्क जास्त असेल तर हा पर्याय टाळणेच योग्य ठरू शकते.

pay house rent with credit card

टीप

वरील माहिती सामान्य आर्थिक माहितीसाठी देण्यात आली आहे. क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी संबंधित बँक, कार्ड जारीकर्ता किंवा पेमेंट प्लॅटफॉर्मच्या अटी व शर्ती तपासून निर्णय घ्यावा.

pay house rent with credit card

NEXT : या ५ चुका करता म्हणून पैसा टिकत नाही

Chanakya Niti | google
येथे क्लिक करा