Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्यात, एअर कंडिशनर आणि पंखे दोन्ही गरमीपासून आराम देतात. पण दोन्ही एकाच वेळी चालवणे योग्य आहे का?
पण एसीसोबत पंखा चालवणे योग्य आहे की नाही हे येथे जाणून घेऊया.
पंखा एसीद्वारे निर्माण होणारी थंड हवा खोलीत पसरवतो, ज्यामुळे खोली लगेच थंड होते.
पंख्याच्या मदतीने खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात तापमान सारखेच राहते, ज्यामुळे एका ठिकाणी जास्त थंडी जाणवत नाही.
एसीचे तापमान थोडं वाढवून आणि पंखा लावल्यास विजेचा वापर कमी करता येतो.
खोली लवकर थंड झाल्यावर, एसीला जास्त काम करावं लागत नाही, ज्यामुळे मशीनवरील दाब कमी होतो.
एसी सुरु असताना पंखा चालवणं हे पूर्णपणे वैयक्तिक गरजेवर अवलंबून असते.