साम टिव्ही ब्युरो
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतच्या सर्व मोसमात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी आणि विराट कोहली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मग पहिल्या क्रमांकावर कोणता खेळाडू आहे?
आयपीएलच्या १६ व्या पर्वाची सुरुवात काही दिवसांतच होणार आहे. १० संघ जेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. यावेळी सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि एमएस धोनीच्या कामगिरीवर नजर असेल. रोहित शर्माने पाच वेळा, तर धोनीने चार वेळा संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्याकडे सर्वाधिक लक्ष असते. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचा विचार केला तर, रोहित आणि धोनी हे दोघे टॉप २ मध्ये आहेत.
आयपीएलच्या सर्व मोसमांचे मानधन जोडले तर मुंबई इंडियन्सला सर्वाधिक ५ वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने सर्वाधिक कमाई केली आहे.
रोहित शर्मानंतर मानधनातून सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू एमएस धोनी आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा चॅम्पियन केलं आहे.
पहिल्या जेतेपदासाठी मैदानावर कठोर मेहनत करणारा आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली आयपीएलच्या १५ पर्वांत सर्वाधिक कमाई करणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने गेल्या वर्षी आरसीबीचं कर्णधारपद सोडलं होतं.
गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून संन्यास घेणारा सुरेश रैना २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू होता. सर्व मोसमातील मानधन मिळून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रैना चौथ्या स्थानी आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्स आणि कोच्ची टस्कर्समधूनही खेळला आहे. जडेजाने २००८ पासून आतापर्यंत मानधनाच्या स्वरुपात जवळपास १०९ कोटी रुपये कमाई केली आहे.
सुनील नरेन याने २०१२ मध्ये कोलकाता नाइट रायडर्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. ११ मोसमात त्याने १०७.२४ कोटी मानधन घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्व मोसमात मानधनातून सर्वाधिक कमाई करणारा पहिला विदेशी खेळाडू आहे.