Dhanshri Shintre
ॲपल पुढील महिन्यात आयफोन १७ सीरीज बाजारात आणणार आहे, ज्यात आयफोन १७, १७ एअर, १७ प्रो आणि १७ प्रो मॅक्सचे अनावरण होऊ शकते.
ॲपल ९ सप्टेंबरला आयफोन १७ सीरीज लाँच करणार असून, यावेळी हँडसेटमध्ये मोठे बदल होणार असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद केले आहे.
अलिकडच्या लीकमध्ये आयफोन १७ सीरीजची संभाव्य किंमत समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी कंपनी आपल्या हँडसेटच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, कंपनी आयफोन १७ सीरीजच्या किमती $५० ने वाढवू शकते. अशा स्थितीत, आयफोन १७ ची सुरुवातीची किंमत $८४९ म्हणजेच ₹८४,९९० असेल.
रिपोर्ट्सनुसार, आयफोन १७ प्रो मॉडेल्सच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनी हे मॉडेल $१,०४९ म्हणजेच ₹१,२४,९९० पासून बाजारात आणू शकते.
आयफोन १६ प्रोची सुरुवातीची किंमत $९९९ ठेवण्यात आली होती, तर यावेळी आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत तब्बल ₹१.५ लाखांपासून सुरू होऊ शकते.
ही किंमत फक्त लीक झालेल्या अहवालांवर आधारित आहे. खरी किंमत अॅपल कंपनीकडून ९ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे जाहीर केली जाईल.
९ सप्टेंबरला अॅपल चार आयफोन, नवीन स्मार्टवॉच आणि एअरबड्स सादर करेल. हा कार्यक्रम वेबसाइट, अॅपल टीव्ही आणि यूट्यूबवर थेट पाहता येईल.