Pooja Dange
सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे माळशेज घाटात पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
माळशेज घाटात पावसात नेहमी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात.
त्यामुळेच, माळशेज घाटात १४ जुलैपासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
एका ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत.
कलम १४४ लागू केल्यामुळे माळशेज घाटात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे.
आता पर्यटकांना माळशेज घाटातील धबधब्यांखाली मनसोक्त भिजून आनंद लुटता येणार नाही.
बंदी असूनही पर्यटक माळशेज घाटात गेले तर, संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.