Dhanshri Shintre
इन्फिनिक्सने भारतात GT 30 5G+ गेमिंग स्मार्टफोन लाँच केला असून, यातील प्रमुख वैशिष्ट्ये आणि फिचर्स जाणून घेऊया.
इन्फिनिक्स GT 30 5G+ स्मार्टफोनचा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट फक्त १९,४९९ रुपयांना उपलब्ध आहे.
इन्फिनिक्स GT 30 5G+ स्मार्टफोनचा ८ जीबी रॅम आणि २२८ जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट २०,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.
तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध, हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० प्रोसेसरसह सुसज्ज असून गेमिंगसाठी आदर्श आहे.
फोनमधील ६ लेयर VC कूलिंग सिस्टम डिव्हाइस थंड ठेवते, तर व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञान जलद कार्यक्षमता सुनिश्चित करते.
हा स्मार्टफोन ५,५००mAh बॅटरीसह येतो आणि ४५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करून लवकर चार्ज होतो.
स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सेल प्रायमरीसह ड्युअल रियर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी दिला आहे.
हा स्मार्टफोन ६.७८-इंचाचा १.५K AMOLED डिस्प्ले १२२४×२७२० पिक्सेल रिझोल्यूशन आणि १४४Hz रिफ्रेश रेटसह सुसज्ज आहे.
GT 30 5G+ गेमिंग स्मार्टफोनमध्ये LPDDR5X रॅम तंत्रज्ञानामुळे जलद आणि सुरळीत मल्टीटास्किंगची सुविधा ग्राहकांना मिळते.
हा फोन १.८७ ग्रॅम वजन आणि ७.९९ मिमी जाडीसह सुसज्ज असून हलका आणि स्लिम डिझाईन ऑफर करतो.