Bharat Jadhav
गाव म्हटलं की मोठा गोंधळ गडबड आणि आवाज असतो. कुठे गायींच हंबरण, तर कुठे शेळ्यांचा आवाज,कुठे नागरिकांच्या आवाज असतोच.
भारतातील एक गाव असं आहे, जेथील अनेक लोकांना ऐकू किंवा बोलता येत नाही. गावात राहणाऱ्या अनेक कुटुंबांमध्ये किमान एक तरी सदस्य असा आहे जो मूक-बधिर आहे.
भारतातील या गावात घरातील एक व्यक्ती मूक-बधिर आढळत असतात. या गावात मुलांचे आवाज—त्यांचे बोलणे, संभाषण आणि खेळतानाचा गोंगाट क्वचितच ऐकू येतात. लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात.
या गावात मूक-बधिर मुलांची पहिली घटना १९०१ मध्ये समोर आली होती. कालांतराने अशा प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली. आजही गावातील अनेक कुटुंबे या समस्येचा सामना करत आहे. हे अनुवांशिक घटकांमुळे घडले आहे, कोणत्याही शापामुळे नाही.
गावावर कोणताच शाप नाहीये. शास्त्रज्ञांच्या मते, दीर्घकाळापर्यंत एका मर्यादित समुदायात झालेल्या विवाहसंबंधांमुळे हा जनुकीय बदल पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला. पण गावातील काही वृद्ध लोक अजूनही याला शाप म्हणतात.
या गावात मूक-बधिर मुलांची पहिली घटना १९०१ मध्ये समोर आली होती. कालांतराने अशा प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली. आजही गावातील अनेक कुटुंबे या समस्येचा सामना करत आहेत. हे अनुवांशिक घटकांमुळे घडले आहे, कोणत्याही शापामुळे नाही.
भारतात अशी अनेक गावे आहेत जी त्यांच्या अनोख्या परंपरा आणि रहस्यमय वैशिष्ट्यांमुळे अनेकांच्या लक्षात राहतात. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील 'धाडकाई' (किंवा 'दाधकाई') हे असेच एक गाव आहे, जे देशभरात 'सायलेंट व्हिलेज' म्हणून ओळखले जाते.
या गावातील रहिवासी आपले दैनंदिन जीवन सामान्यपणे जगण्याचा प्रयत्न करतात. शेती, पशुपालन आणि किरकोळ कामे हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.