Siddhi Hande
भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. जगभरातील चौथ्या नंबरची सर्वात मोठी रेल्वे आहे.
भारतीय रेल्वेच्या रोज हजारो ट्रेन धावतात.रेल्वेच्या कमाईतून सरकारला सर्वात मोठा फायदा होतो.
रेल्वे प्रत्येक दिवशी किती पैसे कमावते हे तुम्हाला माहितीये का?
भारतीय रेल्वे रोज ४०० कोटी रुपये कमावते. हे पैसे रेल्वे तिकीट, मालगाडी, लांब पल्ल्याच्या ट्रेन या माध्यमातून कमवतात.
रेल्वे महिन्याला जवळपास १२००० कोटी रुपये कमवते. यातील सर्वाधिक कमाई ही मालगाड्यांमधून होते.
भारतीय रेल्वेकडून रोज हजारो मालगाड्या धावतात. लाखो टन वजनाचे सामान एका जागेवरुन दुसऱ्या जागी नेले जाते.
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने २०२२-२३ मध्ये मालगाड्यांमधून १,६०,१५८.४८ कोटी रुपये होती.
आरटीआयने दिलेल्या माहितीनुसार,२०१९-२० मध्ये फक्त तिकीट रद्द केल्यानंतर १७२४४.४४ कोटी कमाई केली आहे.