ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय संस्कृतीत नारळाला विशेष महत्व आहे, विशेषत: पूजा- अर्चनेत नारळ महत्वाचे आहे.
अनेकदा तुम्ही देवासमोर नारळ फोडताना पाहिले आहे,पण देवासमोर नारळ का फोडतात माहितीये का?
नारळ फोडल्याने समृद्धी येते पैंशाशी संबधित समस्याचे निराकरण होते.
देवासमोर नारळ फोडणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे.
नारळ हे ब्रम्ह, विष्णू आणि महेश या तीन देवतांचे प्रतिक आहे.
सुरूवातीला नारळ सोलले जाते जे आंतरिक आणि भौतिक इच्छेचे प्रतिक आहे ज्या आपण सोडल्या पाहिजे
नारळ जमिनीवर फोडले जाते जे अहंकाराचे प्रतिक आहे जे आपण सोडले पाहिजे