Chetan Bodke
वेबविश्वामध्ये आपल्या फॅशन आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे मिथिला पालकर...
गायिका, युट्यूब स्टार, मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिथिला पालकरचा आज वाढदिवस
'कन्फ्युजिंग थिंग्स फ्रॉम अ गर्ल' नावाचा व्हिडिओ तिचा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि तेव्हापासून ती चर्चेत आली.
'माझा हनीमून' या मराठी शॉर्ट फिल्ममधून मिथिलाने २०१४ मध्ये फिल्म इंडस्ट्रिमध्ये पाऊल ठेवले.
युट्युबमधून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली असून तिच्या अभिनयाची ओटीटी विश्वात जोरदार चर्चा होत आहे.
मिथिलाने 'ही चाल तुरू तुरू' या गाण्यावर 'कप साँग व्हिडीओ' तयार केला होता. या व्हिडीओमुळे तिच्या क्रिएटिव्हीटीची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली होती.
मिथिला आपल्या अनेक कलाकृतींमुळे सोशल मीडियावर फेमस झाली. तिच्या फॅशनची सुद्धा चाहत्यांमध्ये बरीच चर्चा होते.
कोणतेही आऊटफिट असो, अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये सर्वांचच लक्ष वेधून घेते.
नुकतंच मिथिलाने आमिर खानची लेक ईराच्या लग्नामध्ये हजेरी लावली होती. ईराच्या लग्नामध्ये मिथिलाचा वाढदिवस तिच्या मित्र- मैत्रिणींनी जोरदार पद्धतीने साजरा केला.