ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशभरात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
लहांनापासून ते थोरामोठ्यांपर्यत प्रत्येकजणांमध्ये स्वातंत्रदिनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे.
१५ ऑगस्ट १९४७ म्हणजेच आज भारताला स्वातंत्र मिळवून ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आज सर्वत्र देशाची शान उंचावणारा आपला राष्ट्रध्वज तिरंगा डोलाने फडकवला जात आहे
या स्वांतत्र दिनानिमित्ताने या ध्वजाची रचना कोणी केली ते माहित करून घेऊया
भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगली वेंकय्या आहेत
२ ऑगस्ट १८७६ रोजी तेलुगू ब्राह्मण कुटुंबात पिंगाली यांचा जन्म झाला. त्यांनी मछलीपट्टणम येथे हिंदू हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण आणि मद्रासमधून माध्यमिक शिक्षण घेतले
अवघ्या १९ व्या वर्षी ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये सहभागी झाले. दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धादरम्यान ते लष्करात असताना महात्मा गांधींना भेटले होते.
असं म्हणतात की, गांधीजींना भेटून ते इतके प्रभावित झाले की ते कायमचे भारतात परतले आणि स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले.
देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याने त्यांनी महात्मा गांधीना आपला स्वत:चा राष्ट्रध्वज असावा असं सांगितलं यावर गांधीजीनी राष्ट्रध्वजाची रचना करण्यास मान्यता दिली.
पिंगाली यांनी १९१६ ते १९२१ या ५ वर्षात जगभरातील ३० देशाच्या ध्वजांचा अभ्यास केला यानंतर १९२१ मध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याची रचना केली
पिंगाली यांनी भारताचा ध्वज कसा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत त्याचा आकार कसा असावा याचा अभ्यास करून तिरंगा साकारला
शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला.