ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'नसांमध्ये वेदना होणे' ही सामान्य समस्या झाली आहे. आहारामध्ये थोडे बदल केल्यास आपल्याला आराम मिळू शकतो.
जर तुमच्याही नसांमध्ये सतत वेदना होत असतील तर दररोज १० ते १२ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि नसांच्या वेदना दूर होतात.
अक्रोड , काजू आणि बदाम यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई मोठ्या प्रमाणात असते. जे तुमच्या नसांच्या वेदना कमी करतात.
तुमच्या रोजच्या आहारात पालक सूप, सॅलड यांचा समावेश करा. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात.
नियमित हातांचे व्यायाम करणे नसांसाठी फायद्याचे आहे. स्ट्रेचिंग केल्यामुळे नसांमधील वेदना त्वरित कमी होतात.
ज्या ठिकाणी नसांच्या वेदना होत असतील तिथे थंड पाण्याचा शेक द्यावा. त्यामुळे नसांना लवकर आराम मिळतो.
एवोकॅडोमध्ये पोटॅशियम असते. जे नसांच्या वेदना कमी करण्यास मदत करते.
जास्तच नसांमध्ये सतत वेदना होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.