Surabhi Jayashree Jagdish
दुर्योधनाच्या दुष्ट आणि कपटीपणामुळे द्रौपदी आणि पांडवांना वनवास भोगावा लागला.
द्रौपदी आणि पांडवांसाठी वनवासाचे जीवन खूप कठीण होते, परंतु या काळात त्यांना अनेक देवांनी आशीर्वाद दिला होता.
वनवासात द्रौपदी पांडवांसाठी नेहमी फक्त तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवायची.
वरदान म्हणून सूर्यदेवाने द्रौपदीला अक्षयपत्र हे तांब्याचे पात्र दिलं होतं. ज्याची स्वतःची खासियत होती. हे अक्षयपत्र देताना सूर्यदेवाने वरदान दिले होते की, यामध्ये अन्न शिजवले तर अन्नाची कमतरता भासणार नाही.
एकदा जेव्हा सर्व पांडवांनी रात्री जेवण केलं आणि अन्न संपले. त्यावेळी दुर्योधनाने दुष्टपणे दुर्वास ऋषींना त्यांच्याकडे पाठवलं.
दुर्योधनाला वाटलं, अन्न नसल्याने पांडव ऋषींचं आदरातिथ्य करू शकणार नाहीत आणि रागावून त्यांना शाप देतील.
अक्षयपत्रामुळे द्रौपदीला अन्नाची कमतरता भासली नाही आणि पांडवांच्या पाहुणचाराने दुर्वासा ऋषी आनंदाने परतले. हेच कारण आहे की वनवासात असूनही द्रौपदीने शिजवलेले अन्न पांडवांना कधीच कमी पडले नाही.
Disclaimer या ठिकाणी दिलेली माहिती पौराणिक कथांवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जातेय. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही किंवा खातरजमा करत नाही.
मोर दिवसातून किती तास झोपतो? वेळ ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य