Dhanshri Shintre
सुट्टीसाठी बहुतांश लोक हिमाचल आणि उत्तराखंडमधील थंड हवामानाच्या हिल स्टेशनना भेट देणे पसंत करतात.
अशा वेळी जर तुम्ही कर्नाटकात असाल आणि फिरण्याचा विचार करत असाल, तर हा पर्याय उत्तम ठरेल.
चला तर मग, आज जाणून घेऊया कर्नाटकातील एका निसर्गरम्य आणि मन मोहवून टाकणाऱ्या हिल स्टेशनबद्दल.
खरंतर आपण आज दांडेली या कर्नाटकातील मनमोहक आणि साहसपूर्ण अनुभव देणाऱ्या पर्यटन स्थळाबद्दल बोलणार आहोत.
दांडेलीमध्ये पाहण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणं आहेत, जी पर्यटकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करतात.
दाट जंगल आणि वन्य प्राणी अनुभवण्यासाठी दांडेलीचं वन्यजीव अभयारण्य हे पर्यटकांसाठी एक अद्वितीय आणि रमणीय ठिकाण आहे.
मौलांगी इको पार्क हे दांडेलीच्या घनदाट जंगलांमध्ये वसलेलं निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांना विशेष आकर्षण वाटतं.
शिरोली शिखर येथून दिसणारा सुर्योदय आणि सूर्यास्त पर्यटकांना मोहवून टाकतो, त्यामुळे हे ठिकाण विशेष प्रिय आहे.
सायक्स पॉईंट, साठोडी धबधबा, काली नदी आणि दांडेलप्पा मंदिर ही दांडेलीतील लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत.