Surabhi Jayashree Jagdish
सर्वात सुंदर ऐतिहासिक वास्तूंमध्ये ताजमहालचे नाव प्रथम घेण्यात येतं.
देशातील सर्वात उंच ऐतिहासिक वास्तू कोणती आहे तुम्हाला माहितीच असेल. यावेळी कुतुबमिनारचं लगेच डोळ्यासमोर येतो.
शेकडो वर्षांपूर्वी ही वास्तू कोणाच्या स्मरणार्थ बांधली गेलीये याची तुम्हाला कल्पना आहे का.
आता तुम्ही म्हणाल, कुतुबुद्दीन ऐबक. पण तुमचं हे उत्तर चूक आहे.
तुम्हाला धक्का बसेल की, कुतुबुद्दीन ऐबकच्या स्मरणार्थ कुतुबमिनार बांधला गेला नाही.
ज्याच्या स्मरणार्थ कुतुबमिनार बनवला गेला त्या व्यक्तीचं नाव क्वचितच कोणाला माहित असेल.
सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुतुबमिनार बांधण्यात आला आहे.