Gangappa Pujari
नोकरी, घर आणि गाडी या प्रत्येकाच्या महत्वाच्या मुलभूत गरजा आणि स्वप्न...
प्रत्येकाच्या मनात त्याची एक ड्रीम कार असते, जी खरेदी करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात..
पहिली कार घेताना आनंद साजरा करण्याइतकीच काही गोष्टींची खास काळजी घेणेही गरजेचे असते..
म्हणूनच पहिली गाडी खरेदी करताना या टीप्स नेहमी लक्षात ठेवा...
आपल्याला आवडणाऱ्या गाडीसंबंधी संपूर्ण, सविस्तर माहिती आधी मिळवा. गाडीचे मॅन्यूअल काळजीपुर्वक वाचा, तसेच टेस्ट ड्राईव्हही घ्या.
कारची वॉरंटी संपण्याचाही धोका असतो. त्याबद्दलही सखोल माहिती घ्या.
गाडी खरेदी केल्यानंतर अफ्टर मार्केट एक्ससेसिरीज लावताना काळजी घ्या. चांगल्या प्रतीचे तसेच लावताना कार खराब होणार नाही, याची काळजी घ्या.
नवीन कार ड्राईव्ह करण्यापुर्वी त्याचा ब्रेक, एक्सलेटर या बाबी आधी तपासून पाहा. अतिउत्साहात घाईघाईत गाडी चालवू नका...
गाडी उन्हात लावण्याने रंग उडण्याचा, क्रॅशेस पडण्याचा धोका असतो. अशा बाबी टाळण्यासाठी सावलीत गाडी लावा, आणि वेळोवेळी सर्विसिंग करुन घ्या..
नवीन कार ड्राईव्ह करताना उत्साहाच्या भरात जास्त वेगात पळवू नका.. सुरूवातीला कार कमी स्पीडमध्ये चालवा. जेणेकरुन कार सेट होण्यास मदत होईल...