Shahapur Tourism : पावसाळी ट्रिपसाठी शहापूरजवळ आहे सुंदर हिल स्टेशन, धबधबे अन् हिरवागार निसर्ग पाहून मन होईल प्रसन्न

Shreya Maskar

शहापूरजवळ हिल स्टेशन

इगतपुरी हिल स्टेशन हे नाशिक जिल्ह्यात वसलेले आहे. इगतपुरी हे पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये , शहापूरच्या अंदाजे ४५ किमी ईशान्येस असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.

A hill station near Shahapur | google

प्रसन्न वातावरण

इगतपुरी येथे प्रसिद्ध 'विपश्यना इंटरनॅशनल ॲकॅडमी' (धम्म गिरी) देखील स्थित आहे. येथे तुमचे मन प्रसन्न होते आणि शांत वाटतेय

Pleasant atmosphere | google

पावसाळा

पावसाळ्यात इगतपुरीचे रूपांतर एका हिरव्यागार नंदनवनात होते. 'कॅमल व्हॅली व्ह्यू-पॉइंट', 'विहीगाव धबधबा' आणि 'भातसा नदी खोरे' येथील सुंदर ठिकाणे आहेत.

rainy season | google

कसं जाल?

शहापूरवरून कसारा मार्गे इगतपुरीला जाण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे प्रवासाद्वारे साधारण २ ते २.५ तास लागतात. मुंबईवरून हे अंतर सुमारे १२० ते १५० किमी आहे.

how do you go | google

ट्रेकिंग- किल्ले

इगतपुरीला गेल्यावर ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. जवळच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेले 'कळसूबाई शिखर' वसलेले आहे. तसेच ऐतिहासिक 'त्रिंगलवाडी किल्ला' आणि 'संधन व्हॅली'ला देखील आहे.

Trekking- forts | google

भात्सा नदी खोरे

इगतपुरीजवळ भात्सा नदी खोरे आहे. या ठिकाणी खोल, निसर्गरम्य दऱ्या आणि भात्सा नदीचा प्रवाह पाहायला मिळतो. येथे सुंदर फोटोज काढता येतील.

Bhatsa River Basin | google

घाटनदेवी मंदिर

घाटनदेवी मंदिर हे दरबार, त्रिंगलवाडी आणि हरिहर या शिखरांनी वेढलेले आहे. हे मंदिर 'घाटांची देवी' (घाटनदेवी) यांना समर्पित आहे.

Ghatandevi Temple | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Hill Station | google

NEXT : भारतातील सर्वात लहान किल्ला कोणता? उंची वाचून धक्काच बसेल

India Fort | saam tv
येथे क्लिक करा...