Surabhi Jayashree Jagdish
स्मार्टफोनमध्ये छोट्या छोट्या समस्या येणं सामान्य आहे. पण वेळ जसजसा जातो तसा फोन स्लो होऊ लागतो. मात्र याकडे दुर्लक्ष करू नये.
फोन स्लो होण्याचे एक कारण म्हणजे स्टोरेज फुल होणं. जास्त फाइल्स आणि अॅप्समुळे प्रोसेसिंग कमी होते. स्टोरेज रिकामं ठेवणं महत्त्वाचं आहे.
सॉफ्टवेअर अपडेट न केल्यानेही फोन स्लो होतो. नवीन अपडेट्समध्ये बग्स दुरुस्त केलेले असतात. म्हणून वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे.
फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर वापरल्यास स्पीड कमी होतो. जर असं असेल तर तो लगेच काढून टाका. यामुळे प्रोसेसिंग स्लो होत नाही.
फोन स्लो असल्यास दोन उपाय करा. यामध्ये पहिला म्हणजे फोनला फॅक्टरी रीसेट करा.
दुसरा म्हणजे क्लिनिंग अॅप वापरा.
क्लिनिंग अॅप्स एका टॅपमध्ये स्पीड वाढवतात. ते नको असलेल्या फाइल्स काढून टाकतात. यामुळे फोन स्लो राहत नाही.
न वापरलेले अॅप्स बंद करा. ते बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि प्रोसेसिंग पॉवर वापरतात.
यामुळे फोन स्लो होतो.