Surabhi Jayashree Jagdish
प्री-डायबेटीस म्हणजे शरीरात साखरेचं प्रमाण साधारणपेक्षा जास्त असणं, पण डायबेटीसच्या पातळीपर्यंत न गेलेलं स्थिती.
काही महत्त्वाची लक्षणं असतात जी तुमचं शरीर प्री-डायबेटीक असल्याचं संकेत देऊ शकतात
रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की किडनी अतिरिक्त साखर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वारंवार लघवी लागते.
जास्त लघवीमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे सतत तहान लागणं हे प्री-डायबेटीसचं सामान्य लक्षण आहे.
रक्तातील ग्लुकोज योग्यरीत्या पेशींमध्ये न गेल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.
इन्सुलिनचा परिणाम नीट न झाल्यास शरीरातील चरबी साठवण आणि वापरण्याची प्रक्रिया बिघडते. त्यामुळे वजन अचानक वाढू किंवा घटू शकतं, विशेषतः आहारात बदल न करता.
मान, बगल, कोपर किंवा गुडघ्यांच्या आसपास त्वचा काळपट होणं (Acanthosis Nigricans) हे इन्सुलिन रेसिस्टन्सचं लक्षण असू शकतं, जे प्री-डायबेटीसशी संबंधित आहे.